श्रीलंका दौऱ्यादरम्यान शिखर धवनला आपल्या कुटुंबाची फार आठवण येत होती. शिखरने त्याची भावना त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्यक्त केली होती. अखेर शिखर त्याचा मुलगा झोरावरला भेटण्यासाठी १५ तासांचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला गेला. शिखरने झोरावरला भेटतानाचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. झोरावरला भेटण्यासाठी शिखर नकळत त्याच्या शाळेत गेला आणि हळूच झोरावरच्या मागे उभं राहून त्याचे डोळे बंद केले.

झोरावरने ते हात वडिलांचेच आहेत हे लगेच ओळखले आणि बाबा.. बाबा.. म्हणून आनंदाने ओरडू लागला. यानंतर धवनने मुलाला घट्ट मिठी मारली. तो मुलाचे गालगुच्चे घेताना थकत नव्हता. दोघंही बाप- लेक खूप दिवसांनी भेटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लख्ख दिसत होता. धवनने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, १५ तासांचा प्रवास करुन मी माझ्या कुटुंबाला भेटत आहे.

बीसीसीआयने नुकतेच शिख धवनच्या पगारात १३०० टक्क्याने वाढ केली आहे. भारतीय खेळाडूंपैकी शिखर हा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या पगारात एवढ्या टक्क्यांनी वाढ झाली. या प्रमोशनबद्दल बोलताना शिखर म्हणाला की, ‘गेल्या वर्षी केलेल्या चांगल्या कामगिरीचे हे फळ आहे.’
धवन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद या टीमकडून खेळणार आहे.

टीमने मोहम्मद नबी (१ कोटी), केन विलियमसन (३ कोटी), रिद्धिमान साहा (५ कोटी), मनीष पांडे (११ कोटी), श्रीवत्स गोस्वामी (१ कोटी), यूसुफ पठान (१.९० कोटी), सिद्धार्थ कौल (३.८० कोटी), सचिन बेबी (२० लाख), बिपुल शर्मा (२० लाख), संदीप शर्मा (३ कोटी), कार्लोस ब्रैथवेट (२ कोटी), मेहदी हसन (२० लाख), बिली स्टैनलेक (५० लाख), शाकिब अल हसन (२ कोटी), रिकी भुई (२० लाख), बेसिल थंपी (९५ लाख), तन्मय अग्रवाल (२० लाख), राशिद खान (९ कोटी), टी नटराजन (४० लाख), सैय्यद खलील अहमद (३ कोटी), डेविड वॉर्नर (१२.५० कोटी), भुवनेश्वर कुमार (८.५० कोटी), दीपक हुडा (३.६ कोटी) और सिद्धार्थ कौल (३.८ कोटी) या खेळाडूंना विकत घेतले.