31 May 2020

News Flash

VIDEO : संगीतप्रेमी शिखरच्या बासरीचे सूर ऐकून तुम्हीही म्हणाल, वा रे गब्बर!

क्रिकेटच्या मैदानात 'गब्बर' म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

शिखर धवन, shikhar

क्रिकेटच्या मैदानात ‘गब्बर’ म्हणून ओळखला जाणारा शिखर धवन Shikhar Dhawan सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. गोलंदाजांचे तिनतेरा वाजवणाऱ्या या शिखरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो चक्क बासरी वाजवताना दिसतोय. बसला ना तुम्हालाही धक्का?

क्रिकेटसोबतच शिखरला आणखीही काही गोष्टींची आवड आहे. ती गोष्ट म्हणजे संगीत. या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी असल्या तरीही त्यामध्ये शिखरने अतिशय सुरेख असा सुवर्णमध्ये साधल्याचंही पाहायला मिळालं. शिखरने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं, ‘माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळची गोष्ट आज मी तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. किंबहुना माझ्या व्यक्तीमत्वाची ही एक वेगळीच बाजू आहे, असं म्हणायला हरकत नाही. गेल्या ३ वर्षांपासून मी बासरी (माझं सर्वात आवडतं वाद्य) वाजवायला शिकत आहे. वेणुगोपाल या माझ्या गुरुंकडून या कलेचे धडे गिरवण्याची संधी मिळणं हे मी माझं भाग्यच समजतो. मला या कलेत आणखी पुढे जायचं आहे. पण, निदान एक सुरेख सुरुवात केल्याचा मला आनंद होतोय.’

वाचा : गर्ल गॅंगसोबत किंवा एकटीने फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? या डेस्टीनेशन्सचा नक्की विचार करा

शिखरने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये तो अतिशय सुरेख असा एक राग बासरीच्या सहाय्याने वाजवताना दिसत आहे. त्याच्यात दडललेा हा कलाकार सध्या सोशल मीडियावर सुपरहिट ठरला असून, अनेकांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात समाधानकारक खेळाचं प्रदर्शन करणाऱ्या शिखरने आपल्या आवडीच्या कलेसाठी वेळ काढत शेअर केलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्सध्ये शिखरच्या कलेला दाद द्यायला विसरु नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 9:30 am

Web Title: indian cricketer shikhar dhawan reveals his musical side in video gone viral
Next Stories
1 सहकाऱ्यांना रोजा सोडता यावा यासाठी मैदानावर जखमी झाल्याचा अभिनय करतो हा गोलकीपर
2 क्रिकेट सट्टा प्रकरणात दिग्दर्शक साजिद खान याचेही नाव
3 Afghanistan vs Bangladesh 2nd T20 : रशीदच्या फिरकीची कमाल, अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत जिंकली मालिका
Just Now!
X