ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर क्रिकेटच्या खेळपट्टीवरून भारतीय संघ पोहोचला तो वेगाच्या ट्रॅकवर. बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटला सोमवारी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरसह सहा भारतीय खेळाडूंनी भेट दिली. या वेळी सर्वच खेळाडूंनी या सर्किटवर गाडी चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला.