News Flash

मातृदिन : सचिनसह ‘स्टार’ क्रिकेटपटूंनी मानले आपल्या आईचे आभार

सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

आईसमवेत सचिन तेंडुलकर

आज, मातृदिनानिमित्त, प्रत्येकजण आपल्या आईबद्दल भावना व्यक्त करत आहे. सामान्य व्यक्तीपासून नामवंत व्यक्तींपर्यंत अनेकांनी आपल्या आईप्रती व्यक्त केलेले प्रेम सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात भारताचे स्टार क्रिकेटपटूही मागे राहिलेले नाहीत. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आईचे आभार मानले.

सचिनने लिहिले, “तुमचे वय कितीही असले तरी आई आपल्यासाठी प्रार्थना करते. त्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच लहान असता. माझ्या आयुष्यात मला नेहमीच प्रेम देणाऱ्या दोन आई मिळाल्या, हे माझे भाग्य आहे.” सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याच्या काकीनेही त्याला आईचे प्रेम दिले. त्यामुळे त्याने आईसोबत काकीचाही फोटो शेअर केला आहे.

 

सचिनप्रमाणेच भारताच्या इतर स्टार क्रिकेटपटूंनीही आपल्या आईला धन्यवाद म्हटले आहे. भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही कवितेद्वारे आईसाठी प्रेम व्यक्त केले.

 

माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने आपल्या आईला सर्वात मोठे प्रेरणास्थान म्हटले आहे. योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल त्याने आपल्या आईचे आभार मानले.

 

रैनाने लिहिले, ”नेहमीच माझी शक्ती राहिल्याबद्दल आणि योग्य मार्ग दाखविल्याबद्दल धन्यवाद. आपण नेहमीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहात. सर्व सशक्त मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

शिखर धवननेही एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 6:36 pm

Web Title: indian cricketers including sachin tendulkar thanked to mother on mothers day adn 96
Next Stories
1 “…तर जसप्रीत बुमराह कसोटीत ४०० बळी घेईल”
2 “क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पाकिस्तान लवकरच पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानी असेल”
3 राजस्थानचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या वडिलांचे करोनामुळे निधन
Just Now!
X