आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो. कारगिल युद्धाला आज २२ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आठवण करुन देणारा हा दिवस. भारत कारगिल विजय दिवस साजरा करत असताना अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या लढ्यात प्राण गमावलेल्या जवानांनना श्रद्धांजली वाहिली आहे.

युवराज सिंग, शिखर धवन, सुरेश रैना आणि इतर अनेकांनी भावनिक संदेश देत ट्वीट केले आहेत.

 

 

 

 

 

 

 

भारत आणि पाकिस्तानमध्ये जुलै १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन करून भारतात घुसखोरी केली होती.  समुद्र सपाटीपासून १८ हजार फूट उंची आणि बर्फाळ प्रदेश अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्यानं धाडसानं शत्रूवर विजय मिळवला होता. ८ मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. २६ जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चाललं. अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढा देत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं.