21 September 2020

News Flash

PHOTO भारतीय क्रिकेटवीरांच्या ग्लॅमरस अर्धांगिनी!

भारतात क्रिकेट खेळ न आवडणारी व्यक्ती सापडणे दुर्मिळ.

भारतात क्रिकेट खेळ न आवडणारी व्यक्ती सापडणे दुर्मिळ. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिनला तर क्रिकेटचा देव मानलं जात. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची छायाचित्रे गोळा करणे, मैदानावरील त्याच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरीची माहिती संग्रहित करणे, स्वाक्षरी मिळवणे अशा विविध प्रकारातून चाहत्यांचे क्रिकेटपटूंवरील प्रेम व्यक्त होत असते. आपल्या आवडत्या क्रिकटपटूंची प्रत्येक लहानसहान गोष्ट जाणून घेण्यात त्यांना रस असतो. जाणून घेऊया काही प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूंच्या अर्धांगिनींविषयी –

02-mayanti-langerमयंती लांगर – मयंती लेंगर टिव्हीवरील स्पोर्टस् जर्नलिस्ट असून, तिने अनेक क्रिकेट आणि फुटबॉल सामन्यांचे सूत्रसंचालन केले आहे. देशातील सुंदर अँकरमध्ये तिचे नाव सहभागी आहे. क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीशी तिचे लग्न झाले आहे. (फोटो- Instagram)

04-sagarika-ghatgeसागरिका घाटगे – अभिनेत्री सागरिका घाटगेने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या झहीर खानशी साखरपुडा केला असून, सध्या सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो चांगलेच शेअर हेताना दिसत आहेत. चक दे इंडिया गर्ल नावाने ओळखल्या जाणाऱ्या सागरिकाने अनेक चित्रपटांमधून अभिनय केला आहे.

01-geeta-basraगीता बसरा – भारतीय स्पिन गोलंदाज हरभजन सिंगने २९ ऑक्टोबर २०१५ ला अभिनेत्री आणि मॉडेल गीता बसराशी लग्न केले. गीताने काही चित्रपटांमध्ये अभिनेय केला आहे. हरभजन आणि गीताला हिनाया नावाची मुलगी आहे. (फोटो- Instagram)

03-natasha-jain-gambhirनताशा जैन गंभीर – ज्वेलरी डिझायनर असलेल्या नताशा जैनने ऑक्टोबर २०११ ला क्रिकेटपटू गौतम गंभीरशी लग्नगाठ बांधली. उत्तम फॅशन स्टाइलसाठीदेखील तिची ओळख आहे.

05-deepika-pallikalदीपिका पल्लीकल – भारतीय स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलने दिनेश कार्तिकशी लग्न केले. क्रिकेटर्स कपल्समध्ये दीपिका आणि कार्तिकची जोडी अधिक प्रसिद्ध आहे.

06-hejal-kejहेजल कीच – बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटात हेजलचे दर्शन झाले होते. भारताचा हॅण्डसम क्रिकेटपटू युवराज सिंगशी तिने लग्न केले.

07-sushmita-royसुष्मिता रॉय – सुष्मिता रॉयने क्रिकेटपटू मनोज तिवारीशी लग्न केले असून, दोघेही जवळजवळ सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सात वर्षांच्या दीर्घ रिलेशनशिपनंतर १८ जुलै २०१३ ला दोघांनी लग्न केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:55 pm

Web Title: indian cricketers wives pics mayanti langer sagarika ghatge
Next Stories
1 सचिनला स्ट्राईक न दिल्यानेच यशस्वी ठरलो- सेहवाग
2 पैसे नसल्यामुळे ‘हा’ क्रिकेटपटू लंगरमध्ये जेवायचा आणि गुरूद्वारात झोपायचा…
3 ढिश्यूम.. ढिश्यूम.. मनोरंजनातून!
Just Now!
X