26 February 2021

News Flash

भारतीय फुटबॉल संघ म्यानमारमध्ये दाखल

एएफसी चॅलेंज फुटबॉल चषक पात्रता फेरीच्या स्पर्धेला २ मार्चपासून सुरुवात होणार असून भारतीय संघ मंगळवारी म्यानमारमध्ये दाखल झाला. भारतासह यजमान म्यानमार, तैवान आणि गुआम या

| February 26, 2013 07:21 am

एएफसी चॅलेंज फुटबॉल चषक पात्रता फेरीच्या स्पर्धेला २ मार्चपासून सुरुवात होणार असून भारतीय संघ मंगळवारी म्यानमारमध्ये दाखल झाला. भारतासह यजमान म्यानमार, तैवान आणि गुआम या संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. संदीप नंदी, डेन्झिल फ्रॅन्को, लेनी रॉड्रिग्ज आणि सुनील छेत्री हे चर्चिल ब्रदर्सचे फुटबॉलपटू बुधवारी संघात सामील होतील. राजू गायकवाड, मेहताब होसेन आणि रॉबिन सिंग हे खेळाडू २८ फेब्रुवारीला म्यानमारमध्ये दाखल होतील. ‘‘अ गटातील सर्व संघ स्पर्धात्मकदृष्टय़ा तुल्यबळ आहेत. त्यामुळे प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आमचे ध्येय असेल,’’ असे भारतीय संघाचे प्रशिक्षक विम कोएव्हरमन्स यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 7:21 am

Web Title: indian football team reach yangon for afc challenge cup
Next Stories
1 विजय आला वेशीपाशी..
2 ‘राणा’ प्रताप!
3 भारतीय महासंघाच्या घटना दुरुस्तीस एआयबीएची मान्यता
Just Now!
X