14 December 2018

News Flash

भारतीय मुलींच्या संघाकडून दक्षिण अमेरिकेचा पराभव

आशिया पॅसिफिक आणि युरोपच्या संघाविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला होता.

प्रतिनिधिक छायाचित्र

कनिष्ठ जागतिक  बास्केटबॉल स्पर्धा

ओरलॅण्डो : अमेरिकेत सुरू असलेल्या कनिष्ठ एनबीए जागतिक बास्केटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील गटातील भारतीय मुलींच्या संघाने दक्षिण अमेरिकन संघावर संघर्षपूर्ण लढतीत ४०-३७ अशी मात केली.

आशिया पॅसिफिक आणि युरोपच्या संघाविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्या पाश्र्वभूमीवर मिळालेला हा विजय खूप दिलासादायक होता. सुनिष्का कार्तिकने १७ गुणांची कमाई करत भारताच्या विजयात योगदान दिले. दुसरीकडे भारतीय कनिष्ठ मुलांना पराभव स्वीकारावा लागला.

दक्षिण अमेरिकेच्या संघाने भारताला ५६-४९ असे पराभूत केले.  तरीही दोन्ही संघ बाद फेरीसाठी पात्र  आहेत.

First Published on August 10, 2018 1:01 am

Web Title: indian girls beat south american combined team at jr nba world championships