पहिल्या दोन मोसमामध्ये भारतात फॉम्र्युला-वन शर्यतीचा ‘फॉम्र्युला’ यशस्वी ठरल्यानंतर प्रेक्षकांना बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर आकर्षित करण्यासाठी आता जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनलने नवी शक्कल लढवली आहे. चाहत्यांना मुख्य इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचा थरार यंदा फक्त दीड हजार रुपयांत अनुभवता येणार आहे.
इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीचे तिसरे पर्व २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान रंगणार असून जेपी स्पोर्ट्सने तीन दिवसांच्या तिकिटांपाठोपाठ मुख्य शर्यतीच्या दिवसांची तिकिटेही विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत. रविवारी रंगणारा एक दिवसाचा थरार पाहण्यासाठी चाहत्यांना अवघे दीड हजार रुपये मोजावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांना फॉम्र्युला-वनकडे आकर्षित करण्यासाठी ही तिकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत. दोन सराव शर्यती, पात्रता फेरीची शर्यत आणि मुख्य शर्यत असा तीन दिवसांचा थरार पिकनिक स्टँडमध्ये दोन हजार रुपयांना पाहता येणार आहे.
ग्रँड स्टँडमधील तीन दिवसांची तिकिटे २१ हजार रुपयांना तर एका दिवसाचे तिकिट १२ हजार रुपयांना मिळेल. प्रीमियम स्टँडमधील तीन दिवसांच्या तिकिटासाठी १० हजार तर एका दिवसाच्या तिकिटासाठी ७५०० रुपये मोजावे लागणार आहेत. ही तिकिटे ६६६.ु‘े८२ँ६.ूे या संकेतस्थळावर तसेच दिल्ली, नोएडा, गुरगांव, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि चंडीगढ येथील मर्सिडिझ-बेन्झच्या शोरूममध्ये उपलब्ध आहेत. ‘‘मुख्य शर्यतीच्या दिवशी अधिकाधिक प्रेक्षकांनी स्टेडियमवर हजेरी लावावी, यासाठीच तिकिटांचे दर कमी ठेवण्यात आले आहेत. फॉम्र्युला-वनच्या वेळापत्रकातील सर्वात कमी किंमतीचे तिकिट असलेली ही शर्यत संस्मरणीय ठरेल,’’ असे जेपी स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौर यांनी सांगितले.