News Flash

भारत-बेल्जियम  हॉकी मालिका : भारताचा बेल्जियमवर शानदार विजय

मनदीपने ३९व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर आकाशदीपने ५४व्या मिनिटाला दुसरा गोल साकारला.

| September 27, 2019 02:28 am

अँटवर्प : मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी मध्यंतरानंतर नोंदवलेल्या गोलच्या बळावर भारताच्या पुरुष हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गुरुवारी २-० असा शानदार विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत आता भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे.

मनदीपने ३९व्या मिनिटाला पहिला गोल केला, तर आकाशदीपने ५४व्या मिनिटाला दुसरा गोल साकारला. पहिल्या सत्रात भारताला पहिल्या पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करण्याची संधी चालून आली होती. परंतु गोलरक्षक लॉइक व्हॅन डोरेनने भारताचे प्रयत्न हाणून पाडले. मग बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु भारतीय गोलरक्षक कृष्णन पाठकने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

बेल्जियमकडे सामन्याच्या पहिल्या दोन सत्रांमध्ये चेंडूचा ताबा असतानाही गोल करू न देण्याची काळजी भारतीय बचाव फळीने घेतली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत गुणफलक गोलशून्य बरोबरीत होता.

मनदीपला ३९व्या मिनिटाला गोल झळकावण्यात यश आले. याच आघाडीमुळे अखेरच्या सत्रात भारताने आत्मविश्वासाने कामगिरी केली. बेल्जियमच्या आक्रमणानेही बरोबरीच्या ईर्षेने खेळ केला. मग ५४व्या मिनिटाला आकाशदीपला दुसरा गोल करण्यात यश आले. भारताचा दुसरा सामना २८ सप्टेंबरला होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 2:28 am

Web Title: indian hockey team to 2 0 win over win over belgium zws 70
Next Stories
1 आशियाई वयोगट जलतरण स्पर्धा : भारताच्या पुरुष रिले संघाला सुवर्णपदक
2 ५४ वर्षांचा स्टोन कोल्ड WWE मध्ये करतोय पुनरागमन
3 अपघातात गंभीर जखमी झालेल्या चाहत्याच्या मदतीला धावला हार्दिक पांड्या
Just Now!
X