सुल्तान जोहोर चषक ज्युनिअर हॉकी स्पध्रेच्या गतविजेत्या भारतीय संघाच्या सहभागाबाबत यंदा मात्र अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साइ) हॉकी संघटनेला हिरवा कंदील न दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरिंदर बात्रा म्हणाले की, ‘‘१० ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या जोहोर चषक स्पध्रेत जर संघ सहभागी झाला नाही, तर आंतरराष्ट्रीय महासंघाकडून भारताला आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो.’’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2014 2:26 am