27 January 2021

News Flash

Asian Games 2018 : भारतीय हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, १७-०ने उडवला इंडोनेशियाच्या धुव्वा

सामन्यावर भारताने पूर्ण वर्चस्व

Asian Games 2018 : आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने इंडोनेशियाविरुद्ध १७-० असा धडाकेबाज विजय मिळवला. भारतासाठी हा विजय फार खास ठरला. आशियाई क्रीडा स्पर्धांमधील हा भारताचा सर्वात मोठ्या फरकाचा विजय ठरला. भारतीय संघाकडून एकूण १७ गोल करण्यात आले. मात्र इंडोनेशियाला एकही गोल करता आला नाही. सामन्यावर भारताने पूर्ण वर्चस्व राखले.

भारतीय संघाने सामना सुरु झाल्यापासूनच इंडोनेशियाच्या संघावर दबाव ठेवला होता. भारताकडून सतत होणारी आक्रमणे इंडोनेशियाला परतवता आली नाही. सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मिनिटाला गोल करून रुपिंदरने भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेच दिलप्रीतने ६ व्या आणि ९ व्या मिनिटाला गोल करत ४-०अशी आघाडी वाढवली. त्याने सामन्याच्या ३२व्या मिनिटालाही एक गोल केला. या दरम्यान सिम्रनजीतने १३व्या, ३८व्या आणि ५३व्या मिनिटाला तर मनदीपने २९व्या, ४४व्या आणि ४९व्या मिनिटाला गोल केला. आकाशदीपने १०व्या आणि ४४व्या मिनिटाला तर सुनील (२५), विवेक (२६), अमित (५४), हरमनप्रीत (३१) यांनी १-१ गोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2018 9:47 pm

Web Title: indian hockey team won 17 0 over indonesia to register biggest win asian games
Next Stories
1 Asian Games 2018 : सुवर्णपदक वाजपेयींना समर्पित करणाऱ्या बजरंगचे मोदींकडून कौतुक
2 Asian Games 2018: कबड्डीत भारताला हादरा, दक्षिण कोरियाकडून पराभव
3 Ind vs Eng 3rd Test : भारताची ‘विराट’ खेळी; इंग्लंडला विजयासाठी ४९८ धावांची गरज
Just Now!
X