इंडियन प्रीमिअर लीगसाठी (आयपीएल) करारबद्ध झालेल्या खेळाडूंनी आपल्या संघाच्या सराव शिबिरात भाग घेण्याऐवजी स्थानिक स्पर्धामध्ये खेळावे, असे परिपत्रक बीसीसीआयने २७ संलग्न असोसिएशन्सना पाठवले आहे. पाच संलग्न असोसिएशन्सच्या ट्वेन्टी-२० विभागीय स्पर्धा ३० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत होणार आहेत. पण १६ एप्रिलपासून संयुक्त अरब अमिराती येथे रंगणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडू संघांच्या सराव शिबिरांमध्ये दाखल झाले आहेत. आयपीएलशी करारबद्ध असलेले सर्व खेळाडू या ट्वेन्टी-२० स्पर्धामध्ये खेळतात की नाही, हे संलग्न असोसिएशन्सनी पाहावे, असे या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र ८ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आंतरविभागीय सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत हे खेळाडू सहभागी होणार नाहीत.