News Flash

आफ्रिकेत जिंकण्यासाठी जात आहोत! – प्रशिक्षक रवी शास्त्री

भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.

प्रशिक्षक रवी शास्त्री (संग्रहीत छायाचित्र)

‘‘दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर काहीतरी खास करण्याची संधी भारतीय संघासमोर असेल. आतापर्यंत ज्या संघांसोबत आम्ही खेळलो, त्याच पद्धतीने आम्ही या संघाकडे पाहणार आहे. त्यांच्याविषयी आदर असेल, परंतु आम्ही तिथे जिंकण्यासाठी जाणार आहोत,’’ असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.

भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. भारतीय संघ २७ डिसेंबरला आफ्रिकेकडे रवाना होणार आहे. याबाबत शास्त्री म्हणाले, ‘‘आमच्यासाठी सर्वच प्रतिस्पर्धी सारखे आहेत. प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचा आदर करून आणि प्रत्येक सामन्याकडे मायदेशातील सामन्याप्रमाणे आम्ही पाहतो. आता आमच्यापुढे दक्षिण आफ्रिकेचे आव्हान समोर आहे. दक्षिण आफ्रिकेत आम्ही आतापर्यंत कधीच मालिका जिंकली नसल्यामुळे याकडे स्वतंत्र पद्धतीने पाहिले जात आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2017 2:06 am

Web Title: indian is going to win in africa says ravi shastri indian vs south africa
Next Stories
1 श्रीलंका मालिका उनाडकटच्या कारकीर्दीला कलाटणी देणारी
2 दक्षिण आफ्रिकेसमोर संघनिवडीचे आव्हान
3 वयाच्या ३६ व्या वर्षी तुम्ही काय करत होतात? धोनीवर टीका करणाऱ्यांना रवी शास्त्रींचा सवाल
Just Now!
X