सान्तिआगो (चिली)
भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने चिली हॉकी दौऱ्यातील विजयाची मालिका कायम राखली. भारताने प्रिन्स ऑफ वेल्स कंट्री क्लबवर झालेल्या सामन्यात चिली संघावर २-० अशी मात केली.
या दौऱ्यातील पाचवा सामना खेळणाऱ्या भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजवत सहज विजय मिळवला. पहिल्या तीन सत्रात एकही गोल लगावता न आल्यामुळे संगिता कुमारी (४८व्या मिनिटाला) आणि सुषमा कुमारी (५६व्या मिनिटाला) यांनी अखेरच्या सत्रात दोन गोल करत भारताला विजय मिळवून दिला.
पहिल्या तीन सत्रांमध्ये दोन्ही संघांना गोलशून्यची कोंडी फोडता आली नव्हती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 25, 2021 12:08 am