News Flash

‘धाकड’ गर्ल गीता फोगटची ‘दबंग’ कार, इन्स्टाग्रामवर शुभेच्छांचा पाऊस

गीता फोगटच्या परिवारात नवीन सदस्य

गीता फोगट आपल्या नवीन रेंज रोव्हर कारसोबत

भारतीय महिला कुस्ती क्षेत्रात आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे फोगट परिवार. आतापर्यंत गीता फोगट आणि बबिता फोगट यांनी भारतासाठी कुस्तीमध्ये अनेक पदकांची कमाई केलेली आहे. यासाठी लहानपणापासून दोन्ही बहिणींनी घेतलेली मेहनत आपण सर्वांनी मोठ्या पडद्यावर ‘दंगल’ या चित्रपटाच्या माध्यमातून पाहिली आहे. ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई केली. लहानपणापासून आतापर्यंत आपल्या वडिलांच्या तालमीत गीता फोगटने घेतलेल्या मेहनतीला चांगली फळ मिळताना पहायला मिळतंय.

गीता फोगटने नुकतीच आपल्या स्वतःच्या कमाईतून नवीन रेंज रोव्हर गाडी विकत घेतली. या गाडीसोबतचा फोटो गीताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “आपण आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ आज आपल्याला मिळालं”, असं म्हणतं गीताने हा फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोला नेटिझन्सनेही आपल्या पसंतीची पावती दिली आहे.

Hard work always pays off love with our new Car #rangeroverevoque #landrover @landrover_in

A post shared by geeta phogat (@geetaphogat) on

२०१० साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये गीताने ५५ किले फ्रिस्टाईल प्रकारात भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. याआधी २००९ सालच्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेतही गीताने सुवर्णपदकाची कमाई केली होती. यानंतर २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये गीता फोगटची निवड झाली होती. मात्र या स्पर्धेत तिला कॅनडाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तिच्या या कामगिरीचा बहुमान करत भारत सरकारने २०१२ साली तिला मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2017 4:31 pm

Web Title: indian ladies wrestler geeta phogat buys new range rover car posted a picture on her instagram account
Next Stories
1 अनुष्काच्या प्रेमात पडलेल्या कपुगेदराला विराटने केलं ‘आऊट’
2 ‘बेफिक्रे’ रोहितची अवस्था विसरभोळ्या कर्मचाऱ्यासारखी, ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस
3 ….तर रोहित शर्मा बाद ठरला नसता!
Just Now!
X