31 October 2020

News Flash

Tokyo Olympic 2020 : भारतीय हॉकी संघासमोर खडतर आव्हान

पुरुषांसमोर गतविजेत्या अर्जेंटिनाचं आव्हान

२०२० साली जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकीसंघासमोर खडतर आव्हान असणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघाने काही दिवसांपूर्वी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गटवारी जाहीर केली. या गटवारीत भारतीय पुरुष संघाचा समावेश अ गटात करण्यात आला असून, भारताला माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया यासारख्या दिग्गज संघाशी सामना करायचा आहे.

दुसरीकडे महिला हॉकी संघाचा समावेशही अ गटात करण्यात आला असून या गटात भारतीय महिलांना नेदरलँड, जर्मनी, ग्रेट ब्रिटन या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करायचा आहे.

नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर शहरात झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत भारतीय पुरुषांनी रशियावर तर महिलांनी अमेरिकेवर मात करत, ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीट मिळवलं होतं. त्यामुळे आगामी स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 3:00 pm

Web Title: indian mens hockey team clubbed with reigning champs in 2020 olympics psd 91
टॅग Hockey India
Next Stories
1 “७०-८० च्या दशकातही टीम इंडिया जिंकत होती”; गावसकर विराटवर संतापले
2 सय्यद मुश्ताक अली टी-२० : सूर्यकुमार यादव तळपला, मुंबईची कर्नाटकवर मात
3 दादा, भारताची निवड समिती बदल ! हरभजन सिंहने केली मागणी
Just Now!
X