29 February 2020

News Flash

भारतीय पुरुष संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

स्पेनवर ६-१ असा दणदणीत विजय

(संग्रहित छायाचित्र)

भारत-स्पेन हॉकी मालिका

अँटवर्प (बेल्जियम) : ‘ड्रॅगफ्लिकर’ हरमनप्रीत सिंग याच्या दोन गोलमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियम दौऱ्यातील दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या स्पेनवर ६-१ असा दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत (२८व्या आणि ३२व्या मिनिटाला), कर्णधार मनप्रीत सिंग (२४व्या मिनिटाला), निळकंठ शर्मा (३९व्या मिनिटाला), मनदीप सिंग (५६व्या मिनिटाला) आणि रुपिंदरपाल सिंग (५९व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी गोल केले.

भारतीय महिलांची ग्रेट ब्रिटनवर मात

मालरे : गुरजित कौर हिने अखेरच्या मिनिटाला केलेल्या शानदार गोलमुळे भारताने ग्रेट ब्रिटनवर २-१ अशा फरकाने मात केली. शर्मिला देवी आणि गुरजित यांची कामगिरी भारताच्या विजयात मोलाची ठरली. ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.

First Published on September 29, 2019 1:37 am

Web Title: indian mens team win in indo spain hockey series abn 97
Next Stories
1 विजेतेपदासाठी भारतासमोर आज बांगलादेशचे आव्हान
2 ऑलिम्पिकचे आशास्थान!
3 भारतीय महिलांना आघाडी वाढवण्याची संधी
X
Just Now!
X