News Flash

‘ही जोडी तुटायची नाय’, रोहित-धवनचा वनडे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

सचिन-गांगुलीनंतर अशी कामगिरी करणारी भारताची दुसरी जोडी

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची जोडी सर्वात यशस्वी ठरली. या दोन्ही सलामीवीरांच्या योगदानामुळे भारताला अनेक सामने जिंकता आले. सध्या हे काम रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जोडी भारतासाठी करत आहे. या दोघांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी नोंदवणारी ही भारताची दुसरी जोडी आहे. यापूर्वी, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 176 डावांत 8227 धावा कुटल्या होत्या. तर, जागतिक विक्रमाबाबत सांगायचे झाले तर, वनडेमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडणारी ती सातवी जोडी ठरली आहे. याविक्रमात श्रीलंकेची महिला जयवर्धने आणि कुमार संगकाराची जोडी (5992) दुसऱ्या स्थानी आहे.

पाचव्या वनडेत रोहित-धवनची शतकी सलामी

पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली.  पहिल्या दहा षटकात टीम इंडियाने बिनबाद 65 धावा फलकावर लावल्या. त्यानंतर धवनने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. 14.1 षटकात या दोघांनी भारताचे शतक साकारले. दोघे संघासाठी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असताना आदिल रशीदने रोहितला बाद केले. रोहित 37 धावांचे योगदान देऊन माघारी परतला. रोहित बाद झाल्यानंतर शिखर धवनही जास्त वेळ टिकला नाही. रशिदने त्याला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले. धवनने 10 चौकारांसह 67 धावा केल्या.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000पेक्षा जास्त धावांची भागीदारी

  • 8227   – तेंडुलकर – गांगुली
  • 5992  – संगकारा – जयवर्धने
  • 5475 –  दिलशान – संगकारा
  • 5462 –  जयसूर्या – अट्टापट्टू
  • 5409 – गिलख्रिस्ट – हेडन
  • 5206  – ग्रीनिज – हेनेस
  • 5004 * – रोहित – धवन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 3:03 pm

Web Title: indian openers shikhar dhawan and rohit sharma sets new record of partnership adn 96
Next Stories
1 IPLमध्ये नव्या जर्सीत खेळणार मुंबई इंडियन्सचे खेळाडू!
2 फलंदाजांची ‘भंबेरी’ उडवणारा गोलंदाज यंदाची आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज
3 IND vs ENG: चित्तथरारक सामन्यात भारताची इंग्लंडवर मात, मालिकाही जिंकली
Just Now!
X