News Flash

जैव-सुरक्षेच्या परिघातून भारतीय खेळाडू मुक्त!

भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

‘बीसीसीआय’कडून तीन आठवडय़ांच्या विश्रांतीची मुभा

पीटीआय, लंडन

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने विलगीकरणाला सामोरे जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना जुलै महिन्यात जैव-सुरक्षित वातावरणाच्या परिघातून बाहेर पडण्याची संधी मिळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ते इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी यादरम्यान एका महिन्याहूनही अधिक अवधी असल्याने खेळाडूंच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांना तीन आठवडय़ांच्या विश्रांतीची परवानगी दिली आहे.

भारत-न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर थेट ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ होईल.

‘‘जागतिक अजिंक्यपदाची अंतिम फेरी आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यामध्ये तब्बल ४२ दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस भारतीय खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणाच्या बाहेर पडतील. १४ जुलैपर्यंत त्यांना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी पुन्हा विलगीकरणाला प्रारंभ करावा लागेल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. यादरम्यान खेळाडूंना मित्रमंडळी, कुटुंबीयांसह मनसोक्त हिंडण्याची परवानगी असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 2:34 am

Web Title: indian players bio safety bcci indian team cricket ssh 93
Next Stories
1 अभिनंदन अजिंक्यसेना..! टीम इंडियाच्या ‘त्या’ पराक्रमाचा ICCनं केला मोठा सन्मान
2 ठरलं तर..! ‘ऐतिहासिक’ सामन्यासाठी ICCनं केली पंचांची निवड
3 WTC Final नंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळणार ‘ब्रेक’, मजा-मस्ती करण्यासाठी असणार २० दिवस
Just Now!
X