News Flash

IPL AUCTION 2018 – अखेरच्या फेरीत ख्रिस गेलवर पंजाबकडून बोली, जयदेव उनाडकट ठरला सर्वात महागडा भारतीय खेळाडू

दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंचा बोलबाला

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये रिकाम्या हाती परतलेल्या ख्रिस गेलवर अखेरच्या फेरीत प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने लावलेली बोली आणि जयदेन उनाडकला मिळालेली ११ कोटी ५० लाखांची रक्कम, हे आयपीएलच्या दुसऱ्या दिवशीच्या लिलावाचं वैशिष्ट्य ठरले आहेत. सलग दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांच्या बोली लागल्या, तर अनेकांच्या पदरी निराशा पडली. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वाधिक बोली लागलेले दोन्ही खेळाडू हे राजस्थान रॉयल्स संघाकडेच आलेले आहेत. बेन स्टोक्स १२ कोटींपेक्षा जास्त रकमेसह तर जयदेव उनाडकट ११ कोटी ५० लाखांसह राजस्थानच्या ताफ्यात दाखल झाला आहे. मनिष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेन उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल ११ कोटी ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलेलं आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. गौथम कृष्णाप्पा हा खेळाडू ६ कोटी २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरीक्त वॉशिंग्टन सुंदर, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही चांगल्या रकमेच्या बोली लागल्या. मात्र दुसऱ्या सत्रानंतर सर्व संघमालकांनी स्थानिक खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीवर खरेदी करण्याचा सपाटा लावला. यात किंग्ज इलेव्हन पंजाब, चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी बाजी मारली. मुंबई इंडियन्सनेही काही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलं आहे.

 • जेव्हन सेअरलेस ३० लाखांच्या बोलीवर कोलकाता संघाकडे
 • मंजदूर दर २० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे
 • निधीशम दिनेशन २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
 • श्रीलंकेच्या दुष्मंता चमीराला ५० लाखांच्या बोलीत राजस्थान रॉयल्सने विकत घेतलं
 • अखेरच्या फेरीपर्यंत न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलवर बोली नाहीच
 • अखेर ख्रिस गेलला बोली लागली, २ कोटी रुपयांच्या बोलीमध्ये नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळणार गेल
 • पवन देशपांडे २० लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
 • आर्यमान बिर्ला ३० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे
 • चैतन्य बिश्नोईवर चेन्नई सुपर किंग्जची २० लाखांची बोली
 • मोनू सिंहवर चेन्नई सुपर किंग्जची २० लाखांची बोली
 • क्षितीज शर्मा २० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे
 • मेहदी हसन २० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
 • मोहसिन खान २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
 • महिपाल लोमरावर राजस्थान रॉयल्सची २० लाखांची बोली
 • मार्क वुड १ कोटी ५० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
 • अनुकूल रॉय २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडे
 • मयांक डागर २० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे
 • प्रदीप साहू २० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
 • श्रीलंकेचा अकिला धनंजया ५० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सकडून खेळणार
 • मयांक मार्कंडे २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
 • सयान घोष २० लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार
 • बिपुल शर्मा २० लाखांच्या बोलीत हैदराबाद संघाकडून खेळणार
 • डेल स्टेनवर सलग दुसऱ्या फेरीत बोली नाही
 • आदित्य तरे २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे
 • सिद्धेश लाड २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे
 • प्रशांत चोप्रा २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे
 • टीम साऊदी १ कोटींच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
 • मिचेल जॉन्सन २ कोटींच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार
 • पार्थिव पटेल १ कोटी ७० लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर बंगळुरुकडे
 • नमन ओझा १ कोटी ४० लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअर डेविल्स संघाकडे
 • सॅम बिल्गींज १ कोटींच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जकडे
 • मुरली विजय २ कोटी रुपयांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्जकडे
 • न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवरही बोली नाही
 • सलग दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलवर कोणत्याही संघमालकाची बोली नाही
 • पहिल्या दिवसांमध्ये बोली न लागलेल्या खेळाडूंचा पुन्हा लिलाव होणार
 • जेवणाची सुट्टी, २:३० वाजता पुन्हा लिलावाला सुरुवात होणार
 • एम.एस. मिधुन २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे
 • अनिरुद्ध जोशी २० लाख रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
 • ध्रुव शौरी २० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे
 • कनिष्क सेठ २० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
 • शरद लुंबा २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
 • दक्षिण आफ्रिकेच्या लुंगसानी एनजिडी ५० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
 • १७ वर्षीय नेपाळी क्रिकेट संदीप लामिचहने २० लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार
 • आसिफ के.एम. ४० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे
 • बेन ड्वार्शियस १ कोटी ४० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
 • श्रीवत्स गोस्वामी १ कोटींच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
 • अक्षदिप नाथ १ कोटींच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
 • श्रेयस गोपाल २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
 • तेजिंदर धिल्लॉन ५५ लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे
 • कॅमरुन डेलपोर्ट ३० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार
 • दिपक चहार ८० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
 • तन्मय अग्रवाल २० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
 • अँड्रू टाय ७ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे
 • बिली स्टेनलेक ५० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
 • बिरेंदर सरन २ कोटी २० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे
 • ऑस्ट्रेलियाचा जेसन बेहरनडॉर्फ मुंबई इंडियन्स संघाकडे, बोली १ कोटी ५० लाख
 • न्यूझीलंडचा मिचेल सँटनर ५० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
 • ख्रिस जॉर्डन १ कोटींच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
 • दक्षिण आफ्रिकेचा जिन पॉल ड्युमिनी १ कोटींच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे
 • अफगाणिस्तानचा जहीर खान फक्तीन ६० लाखांच्या बोलीवर राजस्थान संघाकडून खेळणार
 • जगदीशन नारायण २० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
 • १५ मिनीटांची विश्रांती
 • नथू सिंहवर कोणत्याही संघमालकाकडून बोली नाही
 • अनुरित सिंह ३० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
 • दिल्लीचा प्रदीप संगवान १ कोटी ५० लाखांमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
 • अभिषेक शर्मा ५५ लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
 • अंकित शर्मा २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
 • मनजोत कालरा २० लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
 • सचिन बेबी २० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
 • रिंकू सिंह ८० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार
 • महाराष्ट्राच्या अपुर्व वानखेडेवर कोलकाता नाईट रायडर्सची २० लाखांची बोली
 • प्रज्ञान ओझावर कोणत्याही संघाकडून बोली नाही
 • मुजीब झदरान ४ कोटींच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
 • पहिल्या फेरीचा लिलाव संपला, १० मिनीटांची विश्रांती
 • दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनवर बोली नाही
 • मराठमोळा शार्दुल ठाकूर चेन्नई सुपर किंग्जच्या दिमतीला, शार्दुलवर २ कोटी ६० लाखांची बोली
 • न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे, बोली २ कोटी २० लाख
 • राजस्थान रॉयल्सकडून उनाडकटवर ११ कोटी ५० लाखांची बोली
 • गुजरातचा जयदेव उनाडकट ठरला आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू
 • नॅथन कुल्टर नाईल २ कोटी २० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
 • मोहम्मद सिराज २ कोटी ६० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
 • आर. विनय कुमार कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली १ कोटी
 • संदीप शर्मा ३ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
 • मोहीत शर्मा २ कोटी ४० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे
 • मराठमोळा धवल कुलकर्णी ७५ लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
 • रिशी धवनवर बोली नाही
 • अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी १ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
 • बेन कटींग २ कोटी २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
 • ऑस्ट्रेलियाच्या मॉईजेस हेन्रिकेजवरही बोली नाही
 • न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज कोरी अँडरसनवर बोली नाही
 • गुरकिरत सिंह ७५ लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे
 • जयंत यादव ५० लाखांच्या बोलीवर दिल्ली संघाकडून खेळणार
 • डॅनिअल ख्रिश्चन १ कोटी ५० लाखांच्या बोलीवर दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
 • पवन नेगी १ कोटी रुपयांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे लावली बोली
 • वॉशिंग्टन सुंदर ३ कोटी २० लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार
 • मनोज तिवारी १ कोटींच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
 • ट्रॅविस हेडवर कोणत्याही संघमालकाची बोली नाही
 • मनदीप सिंह १ कोटी ४० लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार
 • वेस्ट इंडिजच्या लेंडल सिमन्सवरही बोली नाही
 • शॉन मार्शवरही बोली नाही
 • इयान मॉर्गनवर कोणत्याही संघमालकाकडून बोली नाही
 • इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सवर बोली नाही
 • परदेशी खेळाडूंवर बोली लावण्यात कोणत्याही संघमालकांना स्वारस्य नाही
 • सौरभ तिवारी ८० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे
 • एवीन लुईससाठी ३ कोटी ८० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार
 • मुरगन आश्विन २ कोटी २० लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार
 • शिवील कौशिकवर कोणत्याही संघाकडून बोली नाही
 • इक्बाल अब्दुल्लावर कोणत्याही संघाकडून बोली नाही
 • गौथम कृष्णप्पा ६ कोटी २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
 • जगदीश सुचीतवर कोणत्याही संघाकडून बोली नाही
 • अखेर नदीम ३ कोटी २० लाखांच्या बोलीत दिल्लीच्या संघाकडून खेळणार
 • शाहबाज नदीमसाठी दिल्ली आणि बंगळुरुच्या संघात चढाओढ
 • के.सी. करिअप्पावर कोणत्याही संघाकडून बोली नाही
 • राहुल चहार १ कोटी ९० लाखांच्या बोलीत मुंबई इंडियन्सकडून खेळणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 9:42 am

Web Title: indian premier league 2018 player auction live streaming in marathi
Next Stories
1 IPL 2018 AUCTION: बेन स्टोक्स महागडा खेळाडू, अनुभवी खेळाडूंना वगळून संघमालकांची तरुणांना पसंती
2 IPL 2018 – अकराव्या हंगामाची तारीख ठरली, सामन्यांच्या वेळातही बदल
3 IPL 2018 – चेन्नई सुपर किंग्जच्या प्रशिक्षकपदी स्टिफन फ्लेमिंग
Just Now!
X