इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी १९ डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या लिलावात ९७१ क्रिकेटपटूंचा समावेश असेल. यापैकी ७१३ भारतीय आणि २५८ परदेशी खेळाडू आहेत.

‘आयपीएल’च्या लिलावासाठी खेळाडू नोंदणी प्रक्रिया ३० नोव्हेंबरला संपली. आता सर्व संघांना इच्छुक खेळाडूंची नावे देण्यासाठी ९ डिसेंबपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सर्व संघांमधील ७३ जागांसाठी होणाऱ्या लिलावात २१५ (१९ भारतीय) अनुभवी, ७५४ (६३४ भारतीय) नव्या खेळाडूंचा आणि दोन सहसदस्य राष्ट्रांतील खेळाडूंचा समावेश आहे. लिलाव प्रक्रियेचे काम ुज एडमेड्स पाहणार आहेत. लिलावात अन्य देशांपैकी ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ५५ खेळाडू समाविष्ट आहेत. त्यानंतर श्रीलंका (३९), न्यूझीलंड (२३) आणि इंग्लंड (२२) यांचा क्रमांक लागतो.