News Flash

भारताच्या नेमबाजांचे शिबीर लांबणीवर

दिल्लीमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेल्याने हा निर्णय राष्ट्रीय नेमबाजी महासंघाकडून घेण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची तयारी करणाऱ्या निवडक नेमबाजांचे १ ऑगस्टपासून होणारे सराव शिबीर लांबणीवर टाकण्यात आले आहे. दिल्लीमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेल्याने हा निर्णय राष्ट्रीय नेमबाजी महासंघाकडून घेण्यात आला आहे.

डॉ. कर्णी नेमबाजी केंद्रावर गुरुवारी महिला राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षकालाही करोना झाल्याचे सिद्ध झाले. मात्र त्यानंतरही हे सराव शिबीर सुरू ठेवण्याचे नेमबाजी महासंघाने म्हटले होते. मात्र दिल्लीची परिस्थिती ही करोनासाठी भयावह असल्याने शिबिराचे आयोजन सध्या योग्य नसल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. पुढील आठवडय़ात शिबिराच्या आयोजनाच्या दृष्टीने नेमके काय आवश्यक आहे याचा आढावा घेण्यात येईल, असे महासंघाने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 12:02 am

Web Title: indian shooters camp extended abn 97
Next Stories
1 बाबा.. ऑन ड्युटी! हार्दिक पांड्याने पोस्ट केला मजेशीर फोटो
2 IPL 2020 : तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयचे कडक नियम, खेळाडूंची ४ वेळा करोना चाचणी
3 तुमच्या नियमाप्रमाणे काम करेन, समालोचनाची संधी द्या ! संजय मांजरेकरांची BCCI ला विनंती
Just Now!
X