08 March 2021

News Flash

विश्वचषक  नेमबाजी स्पर्धा : भारतीय नेमबाजांची निराशाजनक कामगिरी

नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल गटात भारताच्या नेमबाजांनी निराशा केली.

| February 26, 2019 03:11 am

रशियाच्या सर्जे कामेन्स्कीने २४९.४ गुणांसह सुवर्ण

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल गटात भारताच्या नेमबाजांनी निराशा केली. या गटाच्या पात्रता फेरीत भारताचे तिन्ही नेमबाज खूप पिछाडीवर फेकले गेल्याने भारताच्या या गटातील आशा संपुष्टात आल्या आहेत.

या गटात भारताच्या आशा दिव्यांशू सिंग पनवार, रवी कुमार आणि दीपक कुमार यांच्यावर होत्या. मात्र हे तिघे अनुक्रमे १२, १४ आणि ३४ स्थानांवर फेकले गेल्याने भारताच्या या गटातील पदकाच्या अपेक्षा संपुष्टात आल्या आहेत. भारताने सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये मोठे यश मिळवल्यानंतर सोमवारी भारताला अपयशाचा सामना करावा लागला. भारतासाठी पहिल्या दिवशी अपूर्वी चंडेलाने १० मीटर एअर रायफल प्रकारात तर दुसऱ्या दिवशी सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकांची कमाई केली होती.

दिव्यांशूला ६२७.२, रवी कुमारला ६२७ तर दीपक कुमारला ६२४.३ गुणांवर समाधान मानावे लागले. भारताच्या एकाही नेमबाजाला पदकावर नाव कोरता न आल्याने या गटातून भारताला ऑलिम्पिक पात्रतेची जागा मिळवता आली नाही. आता पुढील विश्वचषक स्पर्धेची वाट पाहून त्यातून २०२० टोक्यो ऑलिम्पिक  पात्रतेसाठी भारतीय नेमबाजांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रशियाच्या सर्जेला सुवर्णपदक

रशियाच्या सर्जे कामेन्स्कीने २४९.४ गुणांसह सुवर्ण, चीनच्या युकुन लिऊने २४७ गुणांसह रौप्य तर तर २२५.९ गुणांसह झिचेंग हुई याने कांस्यपदक मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 3:11 am

Web Title: indian shooters disappointing performance in issf shooting world cup
Next Stories
1 मानधनाकडे नेतृत्व
2 भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत चर्चा
3 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : एअर इंडिया, शिवशक्ती यांना जेतेपद
Just Now!
X