आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा दास हिची आज UNICEFची भारतीय युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. हिमा मुलांचे अधिकार आणि गरजा यांच्याबाबत जागरुकता निर्माण करणे, मुले व युवकांच्या समस्या मांडणे यात कार्यरत असणार आहे आणि या निमित्ताने समाजाच्या विकासात आपले योगदान देणार आहे.

हिमा दासने IAAF वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये तिने ४०० मीटर फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. ट्रॅक इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला ठरली होती. १८ वर्षीय हिमाने ५१.४६ सेकंदात ४०० मीटरचे अंतर पार करीत पहिली जागा मिळवली होती.

‘आसामच्या कन्येने (हिमा) अत्यंत दुर्मिळ असे यश मिळवले आहे. तिने प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. तिचे अभिनंदन!’, असे मत मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले होते.