News Flash

जेतेपदाची माळ चेन्नईच्या गळ्यात

मेलसन आल्व्हिज अंतिम लढतीतील नायक

पदार्पणात चषक उंचावण्याचे बेंगळूरुचे स्वप्न भंगले; मेलसन आल्व्हिज अंतिम लढतीतील नायक

पदार्पणात इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीत प्रवेश करून जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या बेंगळूरु एफसीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाहुण्या चेन्नईयन एफसीने ३-२ अशा फरकाने बेंगळूरुवर मात करीत दुसऱ्यांदा इंडियन सुपर लीग जिंकण्याची किमया केली. दोन गोल करणारा मेलसन आल्व्हिज विजयाचा शिल्पकार ठरला.

चेन्नईने पहिल्या सत्रात २-१ अशी आघाडी घेत बेंगळूरुला दडपणाखाली आणले आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळूनही बेंगळूरुला हे दडपण झुगारता आले नाही. सुनील छेत्रीने नवव्या मिनिटाला बेंगळुरुचे खाते उघडले; परंतु मेलसनने १७व्या मिनिटाला चेन्नईला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ४५व्या मिनिटाला साकारलेल्या मेलसनने दुसरा गोल करून मध्यंतराला चेन्नईला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मग दुसऱ्या सत्रात राफेल ऑगस्टोने ६७व्या मिनिटाला गोल करीत चेन्नईची आघाडी ३-१ अशी वाढवली.

उत्तरार्धात बेंगळुरुने पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटाला मिकूने गोल साकारण्यात यश मिळवले; परंतु तो बेंगळुरुचा पराभव टाळू शकला नाही. सुब्राता पॉलला गोल्डन ग्लोव्हचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे भारतीय संघातून त्याला वगळण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 1:49 am

Web Title: indian super league chennaiyin fc beat bengaluru fc to claim second title
Next Stories
1 जेतेपद टिकवण्याचे आव्हान
2 ‘अ+’ श्रेणी हा धोनी व कोहलीचा प्रस्ताव!
3 राहुल द्रविडला चार कोटींचा गंडा
Just Now!
X