नवी दिल्ली : दुबईत होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मार्ग मोकळा झाला आहे. अमित पंघालसह (५२ किलो) ऑलिम्पिकपात्र बॉक्सिंगपटूंचा समावेश असलेला भारतीय संघ २१ मे रोजी दुबईकडे प्रस्थान करणार आहे.

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा आधी भारतात होणार होती; परंतु करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढल्यामुळे ही स्पर्धा दुबईत हलवण्यात आली. २३ मे रोजी स्पध्रेची कार्यक्रम पत्रिका ठरवण्यात येईल, तर २४ मे रोजी स्पध्रेला प्रारंभ होईल. प्रवासाच्या निर्बंधांमुळे आशियाई बॉक्सिंग स्पध्रेमधील भारताच्या प्रवेशापुढे प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. परंतु मंगळवारी संयुक्त अरब अमिरातीमधील प्रशासनाने भारतीय संघाला हिरवा कंदील दिला आहे.

करोनातून सावरत असल्यामुळे मनीष कौशिक (६३ किलो) आणि सतीश कुमार (+९१ किलो) या ऑलिम्पिकपात्र खेळाडूंनी स्पध्रेतून माघार घेतली आहे.

भारतीय संघ

’  पुरुष : विनोद तन्वर, अमित पंघाल, मोहम्मद हसमुद्दीन, वरिंदर सिंग, शिव थापा, विकास कृष्णन, आशीष कुमार, सुमित संगवान, संजीत, नरिंदर.

’  महिला : मोनिका, एमसी मेरी कोम, साक्षी, जस्मिन, सिम्रनजीत कौर, लालबुआतसैही, लव्हलिना बार्गोहेन, पूजा राणी, स्वीटी, अनुपमा.