कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवारी न्यूझीलंड दौ-यासाठी  रवाना झाला आहे. या दौ-यात पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. १९ ते ३१ जानेवारीदरम्यान ही मालिका असेल. पुढील वर्षी होणा-या (२०१५) वनडे वर्ल्डकपच्या तयारीच्यादृष्टीने भारताच्या युवा क्रिकेटपटूंसाठी आगामी न्यूझीलंड दौरा महत्त्वपूर्ण ठरेल, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीने शनिवारी मुंबईत सांगितले .
न्यूझीलंड दौ-यात भारतीय संघ पाच एकदिवसीय मालिका आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यातील पहिला एकदिवसीय सामना येत्या १९ जानेवारी रोजी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत पराभव स्वीकारल्यानंतर न्यूझीलंड दौ-यात कामगिरी उंचावण्याचे मुख्य आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे.
एकदिवसीय मालिका
महेंद्रसिंग ढोणी(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, ईशांत शर्मा, अमित मिश्रा, ईश्वर पांडे, स्टुअर्ट बिन्नी आणि वरुण अरोन
कसोटी
महेंद्रसिंग ढोणी(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, मोहम्मद शामी, ईशांत शर्मा, अंबाती रायडू, भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, झहीर खान, आर. अश्विन, उमेश यादव, वृद्धिमान सहा