द.आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी आणि उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठीच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटी संघात भारताच्या अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने पुनरागमन केले असून हरभजन सिंगला डच्चू देण्यात आला आहे. तर, पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघात उमेश यादवऐवजी श्रीनाथ अरविंदला संधी देण्यात आली आहे.
एकदिवसीय मालिकेत द.आफ्रिकेकडे २-१ अशी आघाडी असल्याने उर्वरित दोन सामने निर्णायक ठरणार आहेत. ट्वेन्टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक आहे. त्यामुळे भारतीय संघातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. संघ आणि कर्णधार धोनीला टीकेला सामोरे जावे लागत आहे. एकदिवसीय सामन्यांत उमेश यादवकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्यामुळे त्याच्याजागी श्रीनाथ अरविंदला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, हरभजन देखील प्रभावी ठरत नसल्याने कसोटी मालिकेसाठी हरभजनऐवजी रविंद्र जडेजाचा विचार करण्यात आला आहे.

द.आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठीचा भारतीय संघ-
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार ), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अक्षर पटेल, हरभजन सिंग, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, श्रीनाथ अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायुडू, गुरूकिरत मान.

द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीचा भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमन साहा, आर अश्विन, रविंद्र जाडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार , उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरूण आरोन, इशांत शर्मा.