News Flash

भारतीय पंच नितीन मेनन यांना आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये स्थान

आयसीसीच्या समितीने केली निवड

भारतीय पंच नितीन मेनन यांना आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये स्थान
नितीन मेनन यांनी आतापर्यंत ३ कसोटी, २४ वन-डे आणि १६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये पंचांची भूमिका निभावली आहे. यानिमीत्ताने मेनन यांना दिग्गज पंचांसोबत काम करायला मिळणार आहेत. पाहूयात आयसीसीच्या एलिट पॅनलमधील इतर पंच आणि त्यांचा अनुभव...

भारताचे पंच नितीन मेनन यांची २०२०-२१ वर्षासाठी आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांची भूमिका बजावण्यासाठी आयसीसी प्रत्येक वर्षाला एलिट पॅनलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पंचांचा समावेश करत असते. गेल्या काही वर्षांत नितीन मेनन यांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निभावलेली चांगली कामगिरी लक्षात घेता त्यांची एलिट पॅनलमध्ये निवड करण्यात आली आहे. श्रीनीवास वेंकटराघवन आणि सुंदरम रवी यांच्यानंतर एलिट पॅनलमध्ये स्थान मिळालेले नितीन मेनन हे भारताने तिसरे पंच ठरले आहेत.

नितीन मेनन यांनी आतापर्यंत ३ कसोटी, २४ वन-डे आणि १६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये पंचांची भूमिका निभावली आहे. आयसीसीचे जनरल मॅनेजर जिऑफ ऑल्ड्रीस, माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर, सामानाधिकारी रंजन मगदुले आणि डेव्डिड बून यांच्या समितीने मेनन यांची एलिट पॅनलमध्ये निवड केली आहे. यामुळे नितीन मेनन यापुढे भारताव्यतिरीक्त अन्य देशांतील क्रिकेट सामन्यात पंच म्हणून कामगिरी बजावताना दिसतील.

एलिट पॅनलमध्ये निवड झाल्यानंतर नितीन मेनन यांनी आनंद व्यक्त केला आहे. एलिट पॅनलमध्ये माझा सहभाग होणं ही माझ्यासाठी आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढणार असून माझ्याकडून चांगलं काम अपेक्षित आहे याची मला जाणीव आहे. यापुढे मिळेल त्या संधीचा चांगला वापर करण्याचं मी निश्चीत केल्याची प्रतिक्रीया मेनन यांनी आयसीसीच्या संकेतस्थळाशी बोलताना दिली. नितीन मेनन यांच्याव्यतिरीक्त सध्या आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये अलिम दार, कुमार धर्मसेना, मारियस इरॅस्मस, ख्रिस गॅफनी, मायकल गॉग, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबुरो, ब्रुस ऑक्सनफर्ड, पॉल रेफेल, रॉड टकर आणि जोएल विल्सन यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 2:20 pm

Web Title: indian umpire nitin menon included in elite panel of icc for 2020 21 psd 91
Next Stories
1 2017 Champions Trophy : भुवनेश्वर कुमार म्हणतो, बुमराहच्या नो-बॉल नंतर सामना फिरला !
2 ‘विराटसेने’साठी वाईट बातमी; BCCI अध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट
3 मास्टर ब्लास्टरने आजच केला होता मोठा पराक्रम
Just Now!
X