पुढील वर्षी ब्राझीलमधील रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय  सामनाधिकारी अशोक कुमार यांची निवड झाली आहे. भारतीय कुस्ती सामनाधिकाऱ्यांची क्रीडा विश्वातील सर्वोच्च स्पर्धेसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जगभरातून ५० सामनाधिकारी, निरीक्षक ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. जागतिक कुस्ती असोसिएशनने आशिया खंडातून नऊ सामनाधिकाऱ्यांची निवड केली. कुमार सध्या एअर इंडियात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

लास व्हेगास येथे झालेल्या जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा आणि त्यानंतर झालेल्या कार्यशाळेतील प्रदर्शनावर सामनाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. कुमार यांनी पन्नासपेक्षा अधिक स्पर्धामध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.