News Flash

जाणून घ्या दिनेश कार्तिक सामन्याआधी काय म्हणाला होता…

या वक्तव्यातून त्याचा आत्मविश्वास दिसून येतो

दिनेश कार्तिक

एका मालिकेत खराब प्रदर्शन आणि आपले स्थान डळमळीत होऊ शकते याची प्रत्येक खेळाडूला कल्पना असतेच. पण सध्या त्यातही भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकला याची सर्वात जास्त कल्पना आहे. संघात टिकून राहण्याच्या दबावातच त्याला देशासाठी सर्वोत्तम खेळी खेळायची आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय संघात आपले स्थान टिकवण्याच्या शर्यतीत दिनेशच्या हाती अपयशच आले आहे. त्याला नेहमीच प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळण्याची संधी मिळाली आहे.

बांग्लादेशसोबत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्याच्या आधी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत दिनेश म्हणाला की, ‘मी अशा परिस्थितीत आहे की माझ्यासाठी प्रत्येक सामना आणि मालिका महत्त्वाची आहे. एका जरी मालिकेत माझे प्रदर्शन खराब झाले तर मला बाहेर काढले जाईल याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मालिकेत सर्वोत्तम खेळी खेळण्याचा प्रयत्न मला करायचा आहे. मला माहित आहे की माझ्यावर सध्या फार दबाव आहे. दबाव आहे म्हणून मी काही कारणं देऊन माहहे हटणार नाही तर मी या संधीचं सोनं करु करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कोणत्या स्पर्धेत खेळतो हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे नाही. मग ती ही स्पर्धा असो किंवा आयपीएल किंवा इंग्लंड विरोधातील कोणती मालिका असो. माझ्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण आहे.’

भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान टिकवण्यासाठीच्या स्पर्धेबद्दल बोलताना दिनेश म्हणाला की, ‘मला प्रत्येक संधीचं सोनं करायचं आहे. सध्या मी विश्वचषकाचा विचार करत नाही. त्यामुळे प्रत्येक सामन्यात चांगली खेळी खेळून मला माझी कामगिरी सुधारायची आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 9:58 am

Web Title: indian wicketkeeper batsman dinesh karthik said before final match against bangladesh
Next Stories
1 ….म्हणून रोहित शर्माने दिनेश कार्तिकचा तो षटकार पाहिलाच नाही!
2 India vs Bangladesh T20: अंतिम सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करत युजवेंद्र चहल पाचव्या स्थानावर
3 जेतेपदाची माळ चेन्नईच्या गळ्यात
Just Now!
X