29 March 2020

News Flash

सराव सामन्यात भारताचा दणदणीत विजय

भारताचा पुढील सराव सामना २५ जानेवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

| January 24, 2016 03:00 am

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारताच्या युवा संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकापूर्वी आयोजित सराव सामन्यात कॅनडावर ३७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४८५ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार इशान किशनने ८६ चेंडूंत १६ चौकार आणि ७ षटकारांसह १३८ धावांची खेळी साकारली. रिकी भुईने ७१ चेंडूंत १० चौकार आणि ७ षटकारांसह ११५ धावांची खेळी केली. रिषभ पंत (६२), महिपाल लोमरूर (५५) यांनी उपयुक्त योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अननुभवी कॅनडाचा डाव ११३ धावांतच आटोपला. लोमरूरने १९ धावांत ३ बळी मिळवले. भारताचा पुढील सराव सामना २५ जानेवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2016 3:00 am

Web Title: indian win in under 19 worldcup trial match
टॅग Indian
Next Stories
1 उ. मुंबई, साताऱ्याची विजयी सलामी
2 वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलचा क्रिकेटला अलविदा
3 मनीष पांडेची शतकी खेळी; अखेरच्या षटकात भारताचा रोमांचक विजय
Just Now!
X