अर्जेंटीनात सुरु असलेल्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या महिला हॉकीपटूंनी ऑस्ट्रियावर 4-2 ने मात करत स्पर्धेची आश्वासक सुरुवात केली. भारताकडून सामन्यात लारेमिसामीने 2, कर्णधार सलिमा टेटे आणि मुमताझ खानने प्रत्येकी 1 गोल झळकावला. ऑस्ट्रियाकडून सब्रिना हर्बी आणि लॉरा केरन यांनी प्रत्येकी 1-1 गोल झळकावला.

अवश्य वाचा – युथ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात दुसरं पदक, ताबाबी देवीला ज्युडोत रौप्यपदक

भारतीय महिलांनी सामन्यात आक्रमक सुरुवात करत पहिल्याच सत्रामध्ये ऑस्ट्रियन खेळाडूंवर दबाव टाकला. यामुळे चौथ्या आणि पाचव्या मिनीटाला गोल करत भारताने सामन्यात 2-0 अशी आघाडी केली. ऑस्ट्रियन खेळाडूंनीही वेळेतच स्वतःला सावरत सामन्यात पुनरागमन केलं. सर्बिनाने १३ व्या मिनीटाला ऑस्ट्रेलियासाठी गोल झळकावला. मात्र यानंतर मुमताझ खान आणि लारेमिसामी 16 व्या आणि 17 व्या मिनीटाला धडाधड गोल करत सामन्यात भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. यानंतर ऑस्ट्रियाकडून लॉरा केरनने एक गोल झळकावला, मात्र सामन्यात पुनरागमन करणं त्यांना जमलं नाही.

अवश्य वाचा – मणक्याच्या दुखापतीवर मात करुन कोल्हापूरच्या शाहुची जिगरबाज कामगिरी, युथ ऑलिम्पिकमध्ये पटकावलं रौप्यपदक