News Flash

विश्वचषकातील धमाकेदार कामगिरीबद्दल मितालीला मिळाले हे ‘ग्रँड गिफ्ट’

भारतीय संघातील खेळाडूंवर बक्षिसांची बरसात

चामुंडेश्वरनाथ यांनी मंगळवारी हैदराबादमध्ये मितालीला ही कार भेट दिली.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला महिला विश्वचषकातील लक्षवेधी कामगिरीबद्दल बीएमडब्ल्यू कार बक्षिस म्हणून देण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती व्ही. चामुंडेश्वरनाथ यांनी मंगळवारी हैदराबादमध्ये मितालीला ही कार भेट दिली. यापूर्वी पीव्ही सिंधूने रौप्य आणि साक्षी मलिकने कांस्यपदक पटकावल्यानंतर चामुंडेश्वरनाथ यांनी त्यांना बीएमडब्ल्यू कार भेट दिल्या होत्या. याशिवाय दीपा कर्माकर आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना देखील त्यांनी अशी भेट दिली होती.

मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात भारतीय संघाला यजमान इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी भारतीय महिला क्रिकेटला या स्पर्धेत एक विशिष्ट उंची प्राप्त करुन देण्यात मितालीला यश आले. त्यामुळेच पराभवानंतरही महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव झाला.

भारतीय संघातील खेळाडूंवर बक्षिसांची बरसात होत असतानाच चामुंडेश्वरनाथ यांनी मितालीला बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणा केली. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोनवेळा महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. यापूर्वी २००५ मध्ये भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. विश्वचषकात संघाच्या कामगिरीसोबतच मितालीने वैयक्तिकरित्याही चांगली कामगिरी केली होती. या स्पर्धेत तिने भारताकडून सर्वाधिक ४०८ धावा केल्या तसेच स्पर्धेत सर्वाधिक धाव करणाऱ्या फलंदाजामध्ये ती दुसऱ्या क्रमाकावर होती. याशिवाय तिने काही अनोखे विक्रमही प्रस्थापित केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2017 7:24 pm

Web Title: indian women captain mithali raj presented bmw car by businessman v chamundeswaranath in hyderabad
Next Stories
1 २०२८ चं ऑलिम्पिक लॉस एंजलिसमध्ये रंगणार
2 आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत ‘सर जाडेजां’चाच बोलबाला
3 Pro Kabaddi Season 5 – ९३ लाखांची बोली लावलेला खेळाडू आजही करतो शेतात काम
Just Now!
X