News Flash

भारतीय महिलांचे लक्ष्य विजयी आघाडीचे

दक्षिण आफ्रिका संघाला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी विजय आवश्यक आहे.

| February 18, 2018 02:06 am

मिताली राज

द. आफ्रिकेविरुद्धची तिसरी ट्वेन्टी-२० लढत आज

भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांतील ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना रविवारी होत आहे. हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाखालील भारताच्या संघाने पहिले दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. आणखी एका विजयासह त्यांचे मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे लक्ष्य आहे.

भारताला ट्वेन्टी-२० मालिकेतही सातत्य राखण्यात यश आले. भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील आजवरच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. आता मालिका विजयाची संधी आहे.

दक्षिण आफ्रिका संघाला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यासाठी डेन व्हॅन निकर्कच्या नेतृत्वाखालील यजमान संघाला सर्व आघाडय़ांवर खेळ उंचवावा लागेल.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), नुझहत परवीन, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, राधा यादव.

दक्षिण आफ्रिका : डेन व्हॅन निकर्क (कर्णधार), मॅरिझेन कॅप, त्रिशा चेट्टी, शबनिम इस्माइल, अयाबोन्गा खाका, मसाबता क्लास, सुन लुइस, ओडिन कर्स्टन, मिग्नन डु प्रीझ, लिझेली ली, क्लोइ ट्रीयॉन, नॅडिन डी क्लेर्क, रेसिबे टोझाखे, मोसेलिन डॅनियल्स.

वेळ : दुपारी १.१५ वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 2:06 am

Web Title: indian women cricket team face south africa in 3rd t20
Next Stories
1 अडचणींवर मात करत हनीयूचे दुसरे सुवर्ण
2 माझ्या यशाचे सगळे श्रेय अनुष्काला-विराट कोहली
3 भारतीय महिलांचा आफ्रिकेवर विजय
Just Now!
X