News Flash

भारतीय महिला हॉकी संघ अर्जेटिनाकडून पराभूत

भारताला अर्जेटिनाच्या ब संघाने २-३ असे पराभूत केले.

(संग्रहित छायाचित्र)

भारतीय महिला हॉकी संघाला अर्जेटिना हॉकी दौऱ्यातील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. भारताला अर्जेटिनाच्या ब संघाने २-३ असे पराभूत केले.

सलिमा टेटे (सहाव्या मिनिटाला) आणि गुरजित कौर (४२व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी गोल केले तर यजमानांकडून सोल पागेला, काँस्टंझा सेरूनडोलो  आणि ऑगस्टिना गोझ्रेलॅनी यांनी गोल करत विजय मिळवून दिला.

कनिष्ठ संघाचा चिलीवर विजय

भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने सहाव्या आणि अंतिम सामन्यात चिलीवर २-१ अशी मात केली. त्यामुळे चिली हॉकी दौऱ्यात भारतीय संघाने अपराजित राहण्याची किमया केली. आघाडीवीर ब्यूटी डंगडंग हिच्या दोन गोलमुळे (सहाव्या आणि २६व्या मिनिटाला) भारताने चिलीवर विजय मिळवला. या सामन्यात यजमानांकडून फ्रान्सिस्का ताला (४०व्या मिनिटाला) हिने एकमेव गोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 12:24 am

Web Title: indian women hockey team loses to argentina abn 97
Next Stories
1 कसोटी मालिकेत इंग्लंडचे निर्भेळ यश
2 स्वत:ला सिद्ध केल्याचे समाधान!
3 शरीरसौष्ठवाच्या स्पर्धाना लवकरच प्रारंभ
Just Now!
X