25 February 2021

News Flash

FIH Series Finals : भारतीय महिलांची जपानवर ३-१ ने मात, पंतप्रधान मोदींनीही केलं अभिनंदन

ड्रॅगफ्लिकर गुरजित कौरचे सामन्यात २ गोल

जपानच्या हिरोशीमा शहरात पार पडलेल्या FIH Series Finals स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत यजमान जपानवर ३-१ ने मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. आशियाई खेळांचं जेतेपद मिळवलेल्या जपानची कडवी झुंज मोडून काढत भारतीय महिलांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं आहे.

कर्णधार राणी रामपालने तिसऱ्या मिनीटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. जपानकडून कानोन मोरीने ११ व्या मिनीटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर भारतीय महिलांनी जपानला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. गुरजित कौरने ४५ व्या आणि ६० व्या मिनीटाला गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2019 7:26 pm

Web Title: indian womens hockey team clinches fih series finals beats japan 3 1 pm modi praise team psd 91
Next Stories
1 पाकिस्तानी तोफखान्यासमोर आफ्रिकेचा गड ढासळला, शादाब-आमिर-वहाबचा भेदक मारा
2 World Cup 2019 : इम्रान ताहीरची गाडी सुसाट, पाकविरुद्ध सामन्यात विक्रमाची नोंद
3 विंडीज दौऱ्यात विराट कोहली-जसप्रीत बुमराहला विश्रांती
Just Now!
X