भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी आज संघाची घोषणा करण्यात आली आहे. प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. वन-डे आणि टी-२० संघामधून वेदा कृष्णमुर्तीला वगळण्यात आलेलं आहे. या एकमेव बदलाव्यतिरीक्त भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. जानेवारी महिन्यात भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये ३ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. वन-डे संघात वेदा कृष्णमुर्तीच्या जागी मोना मेश्राम आणि टी-२० संघात प्रिया पुनियाला जागा देण्यात आली आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिलांचा वन-डे संघ –

मिताली राज (कर्णधार), पुनम राऊत, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, हरमनप्रीत कौर, दिप्ती शर्मा, तान्या भाटीया (यष्टीरक्षक), मोना मेश्राम, एकता बिश्त, मानसी जोशी, दयालन हेमलता, पुनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिलांचा टी-२० संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उप-कर्णधार), मिताली राज, दिप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, अनुजा पाटील, दयालन हेमलता, मानसी जोशी, शिखा पांडे, तान्या भाटीया (यष्टीरक्षक), पुनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया