भारतीय महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरला करोनाची लागण झाली आहे. या आजाराची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यानंतर हरमनप्रीतने चाचणी केली. यात ती पॉझिटिव्ह आढळली.

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघासमवेतच्या एकदिवसीय मालिकेत 32 हरमनप्रीत संघाचा भाग होती. पण पाचव्या सामन्यात दुखापतीमुळे ती पुढची टी-20 मालिका खेळू शकली नाही.

 

त्यानंतर हरमनप्रीतला चार दिवसांपासून ताप येत होता. यानंतर सोमवारी तिची करोनाची चाचणी झाली. आज आलेल्या अहवालात ती पॉझिटिव्ह आली आहे. संसर्गानंतर तिने स्वत: ला आयसोलेट केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत तिची सातत्याने चाचणी केली जात होती. तेव्हा ती तंदुरुस्त होती. हरमनप्रीतव्यतिरिक्त पुरुष क्रिकेटपटुंनाही करोनाची लागण झाली आहे. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि एस बद्रीनाथ आणि इरफान पठाण यांचा समावेश आहे. या सर्वांनी अलीकडेच झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये भाग घेतला होता. हे सदस्य विजेता संघ इंडिया लेजेंड्सचे भाग होते.