25 February 2021

News Flash

अभिमानास्पद! भारताची हरमनप्रीत कौर ICCच्या टी२० संघाची कर्णधार

हरमनप्रीतसह आणखी २ भारतीय खेळाडूंचा समावेश

हरमनप्रीत कौर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज महिला क्रिकेटमधील ICC एकदिवसीय संघ आणि ICC टी२० संघाची घोषणा केली. महिला क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांमधून सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड या संघामध्ये केली जाते. याबाबत अभिमानाची बाब म्हणजे भारताला यंदा टी२० विश्वविजेतेपद मिळवता आले नसले, तरी ICC टी२० संघाच्या कर्णधारपदाचा मान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला देण्यात आला आहे. तर ICC एकदिवसीय संघाचे नेतृत्व सुझी बेट्स हिच्याकडे देण्यात आले आहे.

 

ICC Women’s T20I Team of the Year 2018 संघात हरमनप्रीतव्यतिरिक्त स्मृती मानधना आणि पूनम यादव या दोघींचा समावेश आहे. २०१८ साली झालेल्या टी२० विश्वचषकात या दोघींनीही उल्लेखनीय कामगिरी केली होती.

Next Stories
1 IND vs AUS : अर्धशतक ठोकूनही रोहित चौथ्या कसोटीला मुकणार
2 क्रिकेटपटू ते राजकारणी; बांगलादेशी कर्णधाराचा निवडणुकीत दणदणीत विजय
3 रोहित शर्माला कन्यारत्न
Just Now!
X