News Flash

पोलंड खुली कुस्ती स्पर्धा : विनेश अंतिम फेरीत दाखल

विनेशने सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या अ‍ॅमी अ‍ॅन फीअर्नसाइडला ७५ सेकंदांत नामोहरम केले.

| June 12, 2021 12:11 am

स्तीपटू विनेश फोगट

वॉरसॉ ; भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने पोलंड खुल्या कुस्ती स्पध्रेतील ५३ किलो वजनी गटात शुक्रवारी अंतिम फेरी गाठली आहे.विनेशने सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या अ‍ॅमी अ‍ॅन फीअर्नसाइडला ७५ सेकंदांत नामोहरम केले. मग २०१९च्या जागतिक कांस्यपदक विजेत्या ईकाटेरिना पोलीशच्यूकला नमवले. त्यानंतर मॅटेओ पेलिकोन आशियाई अजिंक्यपद या स्पर्धा जिंकणारी २६ वर्षीय विनेश सलग तिसऱ्या सुवर्णपदकासाठी उत्सुक आहे.

अंशू मलिकची माघार

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची युवा मल्ल अंशू मलिकने पोलंड खुल्या कुस्ती स्पध्रेतून माघार घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 12:11 am

Web Title: indian wrestler vinesh phogat reaches final of poland open 2021 zws 70
Next Stories
1 टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा : ऑलिम्पिकसाठी शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय
2 Euro cup 2020: रशियाचा फुटबॉलपटू मोस्तोवोय याला करोनाची लागण झाल्याने स्पर्धेतून बाहेर
3 Euro cup 2020: स्पर्धेपूर्वी संपूर्ण स्पेन संघाचं करोना लसीकरण
Just Now!
X