आयपीएलचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर, भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठी पर्वणी असणार आहे. घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. यंदाच्या वर्षातला भारतीय संघाचा हा दुसरा महत्वाचा परदेशी दौरा असणार आहे. मात्र या दौऱ्यासाठी इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वॅनने, भारतीय फिरकीपटूंची कामगिरी महत्वाची ठरेल असं म्हटलं आहे. जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ कसोटी, ३ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.

“भारताचे Wrist Spinners (मनगटी फिरकीपटू) इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करु शकतात. मागच्या वर्षात पाकिस्तानचा गोलंदाज यासिर शहाने चांगली कामगिरी केली होती. इंग्लंडचे फलंदाज फिरकीपटूंना खेळताना चाचपडतात हा इतिहास आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाल्यास भारताचे फिरकीपटू चांगली कामगिरी करतील”, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारला असताना, स्वॅन बोलत होता.

असा असेल भारतीय संघाचा इंग्लंड दौऱ्यातला कार्यक्रम –

३ जुलै – पहिली टी-२०, ठिकाण – ओल्ड ट्रॅफर्ड

६ जुलै – दुसरी टी-२०, ठिकाण – कार्डिफ

८ जुलै – तिसरी टी-२०, ठिकाण – ब्रिस्टॉल

————————————————————-

१२ जुलै – पहिली वन-डे, ठिकाण – ट्रेंट ब्रिज

१४ जुलै – दुसरी वन-डे, ठिकाण – लॉर्ड्स

१७ जुलै – तिसरी वन-डे, ठिकाण – हेडिंग्ले

—————————————————————

१ ते ५ ऑगस्ट – पहिली कसोटी, ठिकाण – एजबस्टन

९ ते १३ ऑगस्ट – दुसरी कसोटी, ठिकाण – लॉर्ड्स

१८ ते २२ ऑगस्ट – तिसरी कसोटी, ठिकाण – ट्रेंट ब्रिज

३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर – चौथी कसोटी, ठिकाण – Ageas Bowl मैदान

७ ते ११ सप्टेंबर – पाचवी कसोटी, ठिकाण – ओव्हल