News Flash

नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारत न्यूझीलंड दौऱ्यावर, वेळापत्रक जाहीर

भारत ५ वन-डे, ३ टी-२० सामने खेळणार

भारत न्यूझीलंड सामन्याचे संग्रहीत छायाचित्र

सध्या भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असला तरीही २०१९ साली भारतीय संघाच्या पहिल्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. नवीन वर्षात भारत आपल्या क्रिकेट दौऱ्याची सुरुवात न्यूझीलंडमधून करणार आहे. २३ जानेवारी २०१९ पासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, यामध्ये भारत ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आज भारताच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २०१८ च्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे, यानंतर अवघ्या काही दिवसांच्या कालावधीमध्येच भारतीय संघाला न्यूझीलंडला रवाना व्हावं लागणार आहे.

असं असेल भारतीय संघाचं न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिली वन-डे : २३ जानेवारी २०१९ (नेपियर)

दुसरी वन-डे : २६ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)

तिसरी वन-डे : २८ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)

चौथी वन-डे : ३१ जानेवारी २०१९ (हॅमिल्टन)

पाचवी वन-डे : ३ फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)

—————————————————————-

पहिली टी-२० : ६ फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)

दुसरी टी-२० : ८ फेब्रुवारी २०१९ (ऑकलंड)

तिसरी टी-२० : १० फेब्रुवारी २०१९ (हॅमिल्टन)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2018 3:17 pm

Web Title: indians limited overs nz tour to start with 1st odi on january 23
टॅग : New Zealand
Next Stories
1 दक्षिण आफ्रिकेच्या स्क्वॅश प्रशिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
2 World Badminton Championship : ‘फुलराणी’ सायनाची पुढच्या फेरीत धडक, तुर्कीच्या प्रतिस्पर्ध्यावर केली मात
3 लोकेश राहुलमध्ये भारताचा पुढचा सचिन तेंडुलकर बनण्याची क्षमता – फारुख इंजिनीअर
Just Now!
X