भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीने आपली कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. पहिल्या कसोटीत ३ आणि ३४ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखलेलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात ८९ आणि १३९ धावांची खेळी करणाऱ्या न्यूझीलंडच्या कर्णधार केन विल्यमसनला दुसरं स्थान पटकावलं आहे. कसोटी क्रमवारीत विल्यमसन ९०० गुणांचा टप्पा गाठणारा पहिला न्यूझीलंडचा खेळाडू ठरला आहे. याचसोबत अॅडलेड कसोटी गाजवणाऱ्या चेतेश्वर पुजारालाही कसोटी क्रमवारीत फायदा झालेला आहे.

गोलंदाजीच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नसला तरीही रविचंद्रन आश्विनच्या क्रमवारीत सुधारणा झालेली आहे. पहिला कसोटी सामना न खेळणारा रविंद्र जाडेजाही आपल्या पाचव्या स्थानावर कायम आहे.

कसोटी क्रमवारीतील पहिले १० फलंदाज –

१) विराट कोहली (भारत) – ९२०
२) केन विल्यमसन (न्यूझीलंड) – ९१३
३) स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – ९०१
४) चेतेश्वर पुजारा (भारत) – ८४६
५) जो रुट (इंग्लंड) – ८०७
६) डेव्हिड र्नर (ऑस्ट्रेलिवॉया) – ७९५
७) दिमुथ करुणरत्ने (श्रीलंका) – ७५३
८) डीन एल्गर (दक्षिण आफ्रिका) – ७२४
९) हेन्री निकोलस (न्यूझीलंड) – ७०९
१०) अझर अली (पाकिस्तान) – ७०८

कसोटी क्रमवारीतले पहिले १० गोलंदाज –

१) कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) – ८८२
२) जेम्स अँडरसन (इंग्लंड) – ८७४
३) वर्नेन फिलँडर (दक्षिण आफ्रिका) – ८२६
४) मोहम्मद अब्बास (पाकिस्तान) – ८२१
५) रविंद्र जाडेजा (भारत) – ८०४
६) रविचंद्रन आश्विन (भारत) – ७८६
७) पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – ७७०
८) ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) – ७६४
९) यासिर शाह (पाकिस्तान) – ७५५
१०) जेसन होल्डर (विंडीज) – ७५१