भारताच्या हिमांशू ठाकूरने हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील स्लालोम शर्यतीत निराशा केली. १०७ स्पर्धकांमध्ये त्याला ७२वे स्थान मिळाले. पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या हिमांशूने ही शर्यत तीन मिनिटे ३७.५५ सेकंदांत पार केली. शर्यतीत भाग घेतलेल्या १०७ स्पर्धकांपैकी हिमांशूने शेवटच्या क्रमांकाने ही शर्यत पार केली. अन्य ३५ खेळाडूंना अपात्र ठरवण्यात आले किंवा ते स्पर्धा पूर्ण करू शकले नाही. अमेरिकेच्या टेड लिगेटीाने सुवर्णपदक मिळविले. फ्रान्सच्या स्टीव्ह मिसिलिरला रौप्यपदक, तर अ‍ॅलेक्सी पिन्टूरोल्टला कांस्यपदक मिळाले. हिमांशूच्या पराभवामुळे भारताचे या ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. नदीम इक्बाल व शिवा केशवन यांनी यापूर्वीच निराशा केली आहे.