30 May 2020

News Flash

भारतातील कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा लांबणीवर

करोनामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

 

नोव्हेंबर महिन्यात भारतात होणारी १७ वर्षांखालील वयोगटाची कुमारी  ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) करोना विषाणूचे गंभीर संकट लक्षात घेता शनिवारी याबाबतची घोषणा केली.

कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, अहमदाबाद आणि नवी मुंबई या पाच शहरांमध्ये होणार होती. यजमान भारतासह या स्पर्धेसाठी १६ संघ पात्र ठरले होते. १७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांचा संघ पहिल्यांदाच सहभागी होणार होता. मात्र भारताला आता त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘फिफा’ परिषदेच्या कार्यकारी गटाने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पनामा-कोस्टा रिका येथील २० वर्षांखालील महिलांची विश्वचषक स्पर्धा त्याचबरोबर भारतातील कुमारी विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याची शिफारस के ली होती. त्यानुसार ‘फिफा’ने हा निर्णय घेतला आहे. आता नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असे ‘फिफा’कडून सांगण्यात आले.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) हा निर्णय अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. कुमारी ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेला अद्याप पाच महिन्यांचा अवधी शिल्लक असला तरी फक्त आशियातील पात्रता स्पर्धा झाल्या आहेत. आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका तसेच मध्य आणि उत्तर अमेरिका व कॅरेबियन बेटांवरील पात्रता स्पर्धा अद्याप व्हायच्या बाकी आहेत.

‘‘सहभागी संघ, यजमान शहरे, कर्मचारी तसेच चाहते आणि जनतेच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यामुळे हा निर्णय अपेक्षितच होता. सद्य:स्थितीला या स्पर्धेशी संबंधित असलेल्या प्रत्येक समभागधारकाचे आरोग्याला आमचे प्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे आम्ही कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही,’’ असे स्थानिक संयोजन समितीकडून सांगण्यात आले.

जगभरातील महत्त्वाच्या स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलाव्या लागल्यानंतर भारतात होणारी १७ वर्षांखालील महिलांची विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकणे अपेक्षितच होते. आम्हाला हा निर्णय मान्य आहे. युरोप, आफ्रिका आणि अन्य खंडांमधील पात्रता फे रीच्या स्पर्धा अद्याप व्हायच्या आहेत. त्यामुळे आता ही स्पर्धा पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे,’’

– कुशल दास, ‘एआयएफएफ’चे सरचिटणीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:02 am

Web Title: indias kumari world cup football tournament is on stretch abn 97
Next Stories
1 करोनाविरुद्धची लढत जिंकायची असेल, तर घरीच थांबा – पुजारा
2 ‘हॉकी इंडिया’कडून ७५ लाखांची मदत
3 खांद्यांचे स्नायू बळकट करण्यात तरुणदीप व्यग्र
Just Now!
X