06 March 2021

News Flash

भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

विहारी, जाडेजा यांच्यानंतर आणखी एका खेळाडूला दुखापत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीनं ग्रासलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाल्यानं अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहालाही दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना बुमराहाला एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाला होता. त्यामुळं अखेरच्या कसोटी सामन्याला तो मुकण्याची शक्यता आहे.  १५ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान ब्रिस्बेन येथे अखेरचा कसोटी सामना होणार आहे. त्यापूर्वीच बुमराहाला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघासमोर आणखी एक आव्हान उभं राहिलं आहे.

आणखी वाचा- सिडनीत जिगरबाज खेळी करणारा फलंदाज संघाबाहेर

रिपोर्ट्सनुसार, तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचं स्कॅन करण्यात आलं. स्कॅन रिपोर्टमध्ये स्ट्रेन दिसून येत आहेत. भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहच्या बाबतीत कोणताही धोका घेण्याच्या तयारीत नाही. भारतात होणाऱ्या आगामी इंग्लंड दौऱ्याचा विचार करुन चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहाला आराम देण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या एका सुत्रानं पीटीआयला सांगितलं की, ‘जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीत क्षेत्ररक्षण करत असाताना एबडॉमिनल स्ट्रेन झालं होतं. त्यामुळे तो आता ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही. पण मायदेशात इंग्लंड विरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बुमराह उपलब्ध असणार आहे.’

आणखी वाचा- मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला चौथ्या कसोटीत संधी मिळण्याचे संकेत

बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारतीय वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व करणार आहे. त्यासोबत नवदीप सैनीही असणार आहे. बुमराहच्या जागी नटराजनला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविंद्र जाडेजाच्या जागी शार्दुल ठाकूर तर बुमराहच्या जागी नटराजनला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 9:49 am

Web Title: indias pace spearhead jasprit bumrah ruled out of brisbane test nck 90
Next Stories
1 भारतीय संघाचा ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ आला समोर; रहाणेने अश्विनला मिठी मारली आणि…
2 मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला चौथ्या कसोटीत संधी मिळण्याचे संकेत
3 सिडनीत जिगरबाज खेळी करणारा फलंदाज संघाबाहेर
Just Now!
X