थॉमस आणि उबर चषकासाठीचे राष्ट्रीय सराव शिबीर अपेक्षेप्रमाणे रद्द करण्यात आले असले तरी या स्पर्धासाठी भारतीय बॅडमिंटन संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. जगज्जेती पी. व्ही. सिंधू तसेच गतजागतिक क्रमवारीत अव्वल

स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांत यांच्यावर भारतीय संघाची भिस्त असणार आहे.

जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बी. साईप्रणीथने घोटय़ाच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली असून पुरुष संघात श्रीकांतसह पारुपल्ली कश्यप आणि लक्ष्य सेन यांचा समावेश असेल. महिला संघात सिंधूसह गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली सायना नेहवाल तसेच राष्ट्रकु ल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांना संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ :

*  थॉमस चषक  : किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, लक्ष्य सेन, शुभंकर डे, सिरिल वर्मा, मनू अत्री, बी. सुमित रेड्डी, एमआर. अर्जुन, ध्रूव कपिला, कृष्णप्रसाद गारगा

*  उबर चषक  : पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आकर्षी कश्यप, मालविका बनसोड, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी, पूजा दांडू, संजना संतोष, पूर्विशा एस. राम, जाक्कामपुडी मेघना.