26 February 2021

News Flash

विराट कोहली @25

भारतीय संघाचा युवा फलंदाज विराट कोहलीचा आज २५वा वाढदिवस. भारताच्या या 'रन-मशिन'ने अल्पावधीत क्रिकेट जगतात आपली ओळख निर्माण केली आहे.

| November 5, 2013 01:09 am

भारतीय संघाचा युवा फलंदाज विराट कोहलीचा आज २५वा वाढदिवस. भारताच्या या ‘रन-मशिन’ने अल्पावधीत क्रिकेट जगतात आपली ओळख निर्माण केली आहे. आज विराट कोहली अनेक युवा खेळाडूंचा आदर्श बनला आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३४४ धावा करणाऱ्या विराट कोहलीने जागतिक एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील फलंदाजांच्या विभागात अग्रस्थानावर झेप घेतली आहे. कोहलीने  प्रथमच ही मजल मारली आहे. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीनंतर कोहली हा जागतिक फलंदाजीच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारा तिसरा खेळाडू ठरला.
या युवा आक्रमक खेळाडूचा वाढदिवसही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याच्या वाढदिवसाचा फोटो भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केला आहे. त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी कोहलीला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.  

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2013 1:09 am

Web Title: indias run machine virat kohi turns 25
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 खेळाडूंसाठी प्रेरणादायी!
2 ..तर आनंदच जगज्जेता होईल!
3 सचिनची ‘ती’ हाक अजूनही धरमवीरला साद घालतेय!
Just Now!
X